कारगील विजय दिवस देशभरात साजरा होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |


नवी दिल्ली : ऑपरेशन विजय अर्थात कारगील युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाला २६ जुलै रोजी २० वर्ष होत आहेत. या दिनानिमित्त २५-२७ जुलै दरम्यान द्रास आणि नवी दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून देशभरात अनेक ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.

 

कारगील विजय दिनानिमित्त लडाखमध्ये एक दौड शहीदों के नामआयोजित करण्यात येणार असून या क्षेत्रातल्या अति दुर्गम भागातले नागरिक, माजी सैनिक यात सहभागी होतील. आपल्या जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि युवकांसह जनतेच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवण्याचा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@