रामविलास पासवान यांना धक्का; पक्षात पडली मोठी फुट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



पाटणा : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ति पार्टीला बिहारमध्ये मोठा हादरा बसलाय. लोजपा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून लोक जनशक्ति पार्टी सेक्युलर पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. शर्मा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपण लोजपा पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्षाची स्थापना करणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी पासवान यांच्यावर गंभीर आरोप केले.

 

सत्यानंद शर्मा हे पासवान यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवाय लोजपाच्या स्थापनेपासून ते पासवान यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आले आहेत. याच शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये पासवान यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्यासोबत ११६ पदाधिकाऱ्यांनी लोजपाला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले. लोजपामधील आंतरिक लोकशाही संपली असून तिकीट देण्यासाठी अध्यक्षांना पैसे द्यावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी त्यांनी वैशालीमध्ये पैशांच्या मोबदल्यात वीणा देवी यांना तिकीट देण्यात आल्याचा दाखला दिला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@