पराभवाचे खापर कार्यकर्त्यांवर; प्रियांका गांधींचा पळपुटेपणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाचे खापर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी कार्यकर्त्यांवर फोडले. पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यास कार्यकर्ते यशस्वी झाले नाहीत. कारण कार्यकर्त्यांनी आपले पुर्णपणे योगदान दिले नाही. याचमुळे पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याचे सांगत, प्रियांका यांनी पराभवाची जबाबदारी घेण्यापासून पळ काढला.

 

प्रियंका गांधींनी येन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस पदासह पुर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबादारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात युपीमध्ये काहीतरी चमत्कार घडेल अशी अपेक्षा असताना काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या मानहानीकारक पराभवानंतर सोनिया आणि प्रियांका गांधी या मायलेकी मतदारांचे आभार मानण्यासाठी रायबरेली येथे आल्या होत्या. यावेळी बोलताना प्रियांका यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी कार्यकर्त्यांनावर ढकलत आपले हात झटकले.

 

उत्तर प्रदेशमधील एकमेव जिंकलेली जागा ही रायबरेलीची असून येथून सोनिया गांधी विजयी झाल्या आहेत. यावेळी बोलताना प्रियांका म्हणाल्या, मला बोलायची इच्छा नव्हती पण मला बोलावं लागतंय, रायबरेलीची जागा ही काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे नाही तर मतदारांनी पुढाकार घेतल्याने जिंकली. येथीलच नाही तर राज्यातील जवळजवळ सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आपले पूर्णपणे योगदान दिले नाही. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीतर ज्यांनी पक्षासाठी काम केले नाही अशा कार्यकर्त्यांची यादी तयार करण्याची सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे प्रियांका गांधी पराभवाची जबादारी स्वीकारल्याचे सोडून पळपुटेपणा करतायत का? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@