एक कोटी शेतकऱ्यांना मिळणार पीएम-किसान योजनेचा लाभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



 

 

शंभर दिवसात १ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे कृषिमंत्र्यांचे आदेश


नवी दिल्ली : पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया वेगाने करण्याचे आदेश केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. तोमर यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषीमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना आणि किसान क्रेडिट कार्डसारख्या प्रमुख सरकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली.

 
तोमर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पात्र शेतकरी कुटुंब/लाभार्थ्यांची नोंदणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. जेणेकरून त्यांना पीएम-किसान योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०१९ या कालावधीतील लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरीत करता येईल. यावेळी तोमर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना १८ ते ४० वयोगटातल्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची माहिती दिली. तसेच या योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करत पुढल्या शंभर दिवसात किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत १ कोटी शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी गावनिहाय अभियान राबवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@