सिंगापूर एअरलाइन्सच्या A३८० केबिनचा मुंबई मार्गावर शुभारंभ होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |


 

मुंबई आणि सिंगापूर दरम्यान प्रवास करणारे प्रवासी १ सप्टेंबर २०१९ पासून या मार्गावर सिंगापूर एअरलाइन्सच्या बहुप्रतिक्षित नव्या एअरबस A३८० केबिन उत्पादनांचा आस्वाद (नियामकांची परवानगी मिळाल्यास) घेऊ शकणार आहेत. शुभारंभाचे विमान १ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री २३.४० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करेल.

सुरुवातीच्या टप्प्यात या नव्या केबिन एअरबसकडून घेतलेल्या पाच नव्या A३८० मध्ये बसवल्या जाणार आहेत. त्यानंतर सध्या सेवेत असलेल्या इतर १४ विमानांमध्येही या केबिन उपलब्ध करून देण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. १९ सिंगापूर एअरलाइन्स A३८० मधील या नव्या उत्पादनांचे संशोधन, डिझाइन, विकास आणि बांधणी यासाठी सुमारे ८५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. 'स्पेस मेड पर्सनल, एक्स्पिरियन्स द डिफरन्स' या संकल्पनेवर आधारित या नव्या केबिन्समुळे सर्व क्लासमध्ये अधिक जागा, अधिक खासगीपणा मिळेल. यात खास सिंगापूर एअरलाइन्सच्या ग्राहकांसाठी व्यक्तिगत स्वरुपाचे आणि अधिक खास असे डिझाइन घटक वापरण्यात आले आहेत.

नव्या सिंगापूर एअरलाइन्स A३८० मध्ये चार क्लासेसमध्ये ४७१ सीट्स आहेत. यात अप्पर डेकवर सहा सिंगापूर एअरलाइन्स सूट्स आणि ७८ बिझनेस क्लास सीट्स आहेत. तर मेन डेकवर ४४ प्रीमिअम इकोनॉमी क्लास सीट्स आणि ३४३ इकोनॉमी क्लास सीट्स आहेत.

सिंगापूर एअरलाइन्स सूट्स

अप्पर डेकच्या फ्रंट केबिनमध्ये अत्यंत प्रशस्तपणे सहा सूट्सची रचना करण्यात आली आहे. वर ग्राहकांना वैयक्तिक खासगीपणा आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवेचा अनुभव घेता येईल. या नव्या सूट्सची रचना पियरेजीन डिझाइन स्टुडिओने केली आहे तर त्याची निर्मिती झोडीऍक सीट्स यूकेने केली आहे.

बिझनेस क्लास

यूकेतील जेपीए डिझाइनने डिझाइन केलेले आणि सिंगापूर एअरलाइन्ससाठी जपानच्या जॅम्को कॉर्पोरेशनने तयार केलेले या बिझनेस क्लासचे इंटेरिअर म्हणजे आधुनिक तरीही ऑरगॅनिक रंगसंगतींचा अनोखा मिलाफ आहे. यात वजनाने हलक्या कार्बन कम्पोसाइट घटकांचा वापर करून नजरेला शांत वाटणारे आणि क्लासी अशा लेदर आणि कापडाचा वापर करण्यात आला आहे.

प्रीमिअम इकोनॉमी क्लास

प्रीमिअम इकोनॉमी क्लासमध्ये समकालीन आणि स्टायलिश डिझाइन आहे. १९.५ इंच रुंद सीट ८ इंच मागे जाते आणि ३८ इंचाचा सीट पिच आहे. इथे प्रवाशांना ऍक्टिव्ह नॉईज-कॅन्सलिंग हेडफोन्स आणि आकर्षक १३.३ इंची फूल एचडी मॉनिटर पुरवून प्रवासात मनोरंजनाचा आनंदही वृद्धिंगत करण्यात आला आहे.

इकोनॉमी क्लास

रेकॅरोतर्फे डिझाइन आणि तयार करण्यात आलेल्या इकोनॉमी क्लासच्या सीट्समध्ये नव्या डिझाइनमुळे अधिक जागा आणि अधिक आराम मिळतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि अर्गोनॉमिक्सच्या आधारे या सीटला अधिक लेगरूम आणि पाठीलाही अधिक सपोर्ट देण्यात आला आहे. यात सहा प्रकारे बदलता येणारा हेडरेस्ट आणि दुमडू शकणारे विंग्स आहेत.

क्रिसवर्ल्ड इन-फ्लाइट एंटरटेनमेंट सिस्टम

मायक्रिसवर्ल्ड या नव्या आयएफई इंटरऍक्टिव्ह सुविधेमुळे सिंगापूर एअरलाइन्सच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या A३८० मधून प्रवास करणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या इन-फ्लाइट एंटरटेनमेंटचा (आयएफई) अधिक उत्कृष्ट अनुभव घेता येईल.

आरामदायी इन-फ्लाइट सुविधा

निवडक विमानांतील सूट प्रवाशांना अमेनिटी किट दिले जाईल. यात प्रसाधनसाहित्य आणि परफ्युम किंवा युनिसेक्स किट उपलब्ध आहेत. लाइफस्टाइल वस्तू असलेल्या या किटचे डिझाइन आणि निर्मिती लॅलिकच्या को-ब्रँड भागीदारीत खास पद्धतीने करण्यात आले आहे. प्रत्येक हिज-अँड-हर अमेनिटी किटमध्ये फ्रेगरन्स, लिप बाम आणि खास तयार करण्यात आलेले पाऊच आहे.


२००७ मध्ये सिंगापूर एअरलाइन्सने
A३८० चा वापर केला आणि या विमानांचा वापर करणारी ही जगातील पहिली कंपनी ठरली. २०१४ मध्ये A३८० ची सेवा भारतात सुरू करणारी ही पहिली कंपनी होती. या विमानकंपनीच्या सुपरजंबोची सेवा बीजिंग, फ्रँकफर्ट, हाँग काँग, लंडन, मुंबई, नवी दिल्ली, न्यू यार्क, पॅरिस, शांघाई, सिडनी, टोक्यो आणि झ्युरिक या शहरांसाठी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@