'साहो' चा टीजर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |

 

बाहुबलीमधील आपल्या जबरदस्त अभिनयाच्या अविष्कारानंतर आता आणखी एका अद्वितीय अशा अवतारात प्रभास आपल्याला दिसून येणार आहे. 'साहो' या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या या चित्रपटाचा देशात प्रचंड बोलबाला आहे. श्रद्धा कपूर आणि प्रभास चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा टीजर पाहिल्यावर प्रेक्षकांना एका वेगळ्याच अद्भुत अशा जगात गेल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही असा हा टीजर आहे.


 

या टीजर मध्ये प्रभास सह जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, चंकी पांडे, निल नितीन मुकेश यांच्या भूमिका प्रामुख्याने दिसून येत आहेत त्याचबरोबर चित्रपटात वेंनेला किशोर, मुरली शर्मा, अरुण विजय, प्रकाश बेलवाडी, एव्हलीन शर्मा, सुप्रिथ, लाल, मंदिरा बेदी, टिनू आनंद हे देखील महत्वाच्या भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहेत. 


दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सुजीथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनाबरोबरच कथा देखील लिहिली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी भाषेतील ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. 'साहो' हा बहुप्रतीक्षित चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@