एनसीपीएमध्ये उमाकांत आणि रमाकांत गुंडेचा यांची धृपद कार्यशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



 

धृपद ही भारतीय संगीतातील सर्वात जुनी शैली आहे. ही परंपरा खालील काही विशेष प्रशिक्षण पद्धतींद्वारे आवाज, श्वासावरील नियंत्रण, पीच कंट्रोल आणि रचनेचे पद्धतशीर चित्रण या पैलूंना अधिक निखार देण्यासाठी प्रतिष्ठित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध तसेच कलाप्रकारातील प्रख्यातउमाकांत आणि रमाकांत गुंडेचा आणि त्यांच्या वरिष्ठ शिष्यांकडून शिकण्याची ही अविस्मरणीय संधी उपलब्ध आहे.

कार्यशाळेत खालील विषय शिकवले जातील- 

1. स्वर आणि राग याबद्दलचे विज्ञान

2. राग संगीतासाठी आवाज संस्कृती प्रशिक्षण

3. संगीत आणि योगा - धृपदातील नादयोगा

4. लय आणि तालाचा अभ्यास

सराव अबाधित राखण्याकरिता ही कार्यशाळा प्रत्येक महिन्यात आयोजित केली जाईल.

कार्यक्रम - एनसीपीए आणि धृपद संस्थान भोपाळ न्यास सादर करत आहे उमाकांत आणि रमाकांत गुंडेचा यांची धृपद कार्यशाळा

दिनांक आणि दिवस: शनिवार, १५ जून २०१९

वेळ: सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

स्थळ: वेस्ट रूम १, एनसीपीए

मर्यादित संख्येची नोंदणी स्वीकारली जाईल. चौकशी आणि नोंदणीसाठी, कृपया ६६२२३८१३ किंवा [email protected] वर संपर्कसाधा.

नामांकन शुल्क रु. १००० / - अधिक जीएसटी  तासांच्या एका सत्रासाठी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@