आनंदवार्ता : मानवरहित 'स्क्रॅमजेट'ची चाचणी यशस्वी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान वेगवेगळे आयाम गाठत आहे. भारतीय बनावटीच्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकलचे (एचएसटीडीव्ही) म्हणजेच मानवरहित स्क्रॅमजेटची यशस्वी चाचणी बुधवारी घेण्यात आली. आवाजापेक्षा जास्त वेगाने मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यासाठी भारताने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात हे विमान अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. या यशामुळे स्क्रॅमजेट तंत्रज्ञान असलेल्या देशांच्या गटात भारताचा समावेश झाला आहे.

 

बंगालच्या उपसागरातील डॉ. अब्दुल कलाम बेटावर सकाळी ११.२५ वाजताच्या सुमारास संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) ही चाचणी घेतली, अशी माहिती डीआरडीओच्या सूत्रांनी दिली. एका नव्या तंत्रज्ञानाची चाचणी बुधवारी घेण्यात आली. रडारच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही चाचणी यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@