आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनदरवाढीचे संकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



 

दोहा : ओमानच्या खाडीतील तणावाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजारावर उमटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच भागात दोन तेलवाहू जहाजांवर गुरुवारी पुन्हा संदिग्ध हल्ला झाला. अमेरिकेने याचा आरोप ईराणवर केला आहे. ही दोन्ही जहाजे संयुक्त अरब अमिरात (यूएई) ची राजधानी अबू धाबीच्या बंदरावरून रवाना झाली होती. पाकिस्तान आणि ओमानच्या बंदरांना तेलवाहू जहाजांकडून संकटात असल्याचे संदेश मिळाले होते.

 

जहाजांतील एक जहाज नॉर्वेच्या मालकीचे आहे. तेल कंपनी फ्रंटलाइनने दिलेल्या माहितीनुसार, फ्रंट अल्टेयरला ओमानच्या खाडीमध्ये आग लागली. हे जहाज मंगळवारी रात्री उशिरा युएईच्या बंदरावरून रवाना झाले. जहाज ३० जूनला तैवानच्या काऊशुंग बंदरावर पोहोचणार होते. या जहाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तेल होते.

 

दुसरे जहाज पनामाचे झेंडे असलेले कोकुका करेजियस होते. या जहाजांवर कोणी हल्ला केला आणि का केला याबाबत खुलासा झालेला नाही. १२ मे रोजी चार तेलवाहू जहाजांवर हल्ला झाला होता. फुजैरा येथील बंदरापासून काही अंतरावर समुद्रात उभ्या असलेल्या या जहाजांवर हल्ला झाला होता, अशा प्रकारे तेल वाहून नेणाऱ्या जहाजांवर होणारे हल्ले याचा अर्थ थेट इंधनदरवाढ असा होतो. तेल वाहतूकीसाठी आधीच मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. त्यात ओमानच्या खाडीत होणारा संघर्ष हे एक इंधनदरवाढीचे कारण बनत चालले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@