एएन - ३२ विमान दुर्घटना : १३ जण मृत घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : वायुसेनेच्या बेपत्ता झालेल्या 'एएन-३२' विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या लिपोच्या उत्तरीय भागात विमानाचे काही अवशेष आढळले होते. गुरुवारी सकाळी ८ जणांची बचाव टीम घटनास्थळी गेली होती. त्यांनी याची पुष्टी केल्यानंतर भारतीय वायुसेनेने ट्विट करत ही माहिती दिली.

 
 
 

अरुणाचल प्रदेशमधील जोरहाट इथून भारतीय वायुसेनेच्या 'एएन-३२' विमानाने ३ जूनला दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी उड्डाण केले होते. मेंचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडवर या विमानाचे लँडिंग होणे अपेक्षित होते. पण उड्डाणानंतर अर्ध्या तासात या विमानाचा जमिनीशी संपर्क तुटला. ते विमान बेपत्ता झाले. त्यानंतर काही दिवसांनी त्याचे अवशेष आढळून आले परंतु प्रवाशांची माहिती मिळाली नव्हती.

 

अपघाताचे ठिकाण अतिशय उंचावर आणि घनदाट जंगलात आहे. त्यामुळे विमानाचे अवशेष असलेल्या ठिकाणी पोहचणे हे आव्हानात्मक काम होते. त्यानंतर गुरुवारी भारतीय वायुसेनेची बचाव टीम याठिकाणी पोहचली आणि त्या विमानातील कोणीही वाचले नसल्याची माहिती दिली.

 

अशी आहेत वीर जवानांची नावे

 

- फ्लाईट लेफ्टनंट एम गर्ग

- फ्लाईट कमांडर चार्ल्स

- फ्लाइट लेफ्टनंट मोहंती

- फ्लाइट लेफ्टनंट तनवर

- स्क्वाड्रन लीडर विनोद

- फ्लाइट लेफ्टनंट थापा

- सार्जेंट अनूप

- कॉपोर्रल शारिन

- वॉरंट ऑफिसर केके मिश्रा

- एअरक्राफ्ट मॅन पंकज

- एअरक्राफ्ट मॅन एसके सिंह

- नॉन कॉम्बॅटंट राजेश कुमार

- नॉन कॉम्बॅटंट पुतीली

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@