'या' यादीत स्थान मिळवणारा विराट एकमेव भारतीय खेळाडू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019
Total Views |



मुंबई : फोर्ब्सने मंगळवारी जाहीर केलेल्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने १०० वे स्थान पटकावले आहे. १०० जणांच्या या यादीमध्ये तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. जून २०१८ ते जून २०१९पर्यंत विराटची कमाई ७ कोटींनी वाढून १७३ कोटींवर पोहोचली आहे. मात्र तरीही विराट ८३ स्थानावरून १००व्या स्थानावर पोहोचला आहे.

 

या यादीत अर्जेंटिनाचा फुलबॉलपटू लियोनेल मेसी अव्वल स्थानी आहे. मेसीने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला पछाडून पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. लियोनेल मेसीची गेल्यावर्षीची कमाई ८८१.७२ कोटी एवढी होती. तर रोनाल्डोने गेल्यावर्षी ७५६.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यादीतील एकमेव क्रिकेटर विराट कोहली आणि मेसीच्या कमाईची तुलना केली, तर मेसीची कमाई विराटच्या पाच पटीने जास्त आहे. फोर्ब्सच्या कमाईमध्ये खेळाडूंचा वार्षिक पगार, टुर्नामेंटमधील जिंकलेली रक्कम, जाहिराती इत्यादींचा समावेश असतो.

 

टेनिसपटू सेरेना विलियम्स या यादीत टॉप १०० मध्ये एकमेव महिला खेळाडू आहे. गेल्या वर्षी सेसेनाची कमाई २०२.५ कोटी होती. टेनिसपटूमध्ये रॉजर फेडरर ६४७ कोटींच्या कमाईसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे या यादीत पहिल्या तीन स्थानावर फुटबॉलपटू आहेत. लियोनेल मेसी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार हे खेळाडू टॉप-३ मध्ये आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@