नक्षली नेत्या नर्मदाला पतीसह अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019
Total Views |


 


गडचिरोली : नक्षल चळवळीतील सीपीआय (माओवादी) संघटनेची एकमेव महिला सदस्य असलेल्या नर्मदा अक्का हीला पतीसह गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर सरकारने लाखांचे बक्षीस ठेवले होते. अद्याप गडचिरोली पोलीस अथवा राज्याच्या नक्षलविरोधी अभियान कार्यालयाने याला दुजोरा दिलेला नाही. मात्र, या दोघांना आठवडाभरापूर्वीच गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केले गेले असून सध्या त्यांची सविस्तर चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

नर्मदाला कॅन्सरने ग्रासले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वीच किरणकुमार व नर्मदा हे दोघेही चळवळीतून बाहेर पडले. हैद्राबाद येथील कॅन्सर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी ती उपचारांसाठी रुग्णालयात गेली होती. ही माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली. त्यामुळे तेलंगणा पोलीस तिच्या मागावर होतेच. मात्र,या दाम्पत्यावर तेलंगणा राज्यात एकही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे तेलंगणा पोलिसांनी नर्मदाची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. प्राप्त माहितीच्या आधारावर गडचिरोली जिल्हय़ातील प्राणहिता पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपअधीक्षक बन्सल हैदराबाद येथे पथकासह गेले व तिथेच या दाम्पत्याला अटक केली. अशी माहिती समोर येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@