वादग्रस्त एलईडी बेल्स बदलणार नाही; आयसीसीचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019
Total Views |



लंडन : आयसीसी विश्वचषक २०१९मध्ये आयसीसीचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरत आहे. आयपीएलप्रमाणे विश्वचषक सामन्यांमध्ये एलईडी बेल्स हे सर्व संघांची डोकेदुखी ठरत आहेत. अनेक तक्रारीनंतरदेखी आयसीसीने हे बेल्स बदलण्यास नकार दिला आहे. "विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. तसे झाल्यास विश्वचषकाच्या विश्वासार्हतेशी तडजोड केल्यासारखे होईल. सर्व दहा संघांसाठी सगळ्या सामन्यात एकसारख्याच गोष्टी असतील." असे आयसीसीने सांगितले आहे.

 

या विश्वचषकामध्ये चेंडू यष्ट्यांवर आदळूनही एलईडी बेल्स पडत नसल्याचे जवळपास ५-६वेळा आढळून आले. बेल्स वजनदार असल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगितले जात आहे. आयसीसीने सांगितले की, "मागील चार वर्षात यष्ट्या बदललेल्या नाहीत. विश्वचषक २०१५पासून सर्व आयसीसी स्पर्धांमध्ये तसेच प्राथमिक क्रिकेट स्पर्धांमध्ये या यष्ट्यांचा वापर होत आहे. याचा अर्थ असा की, या यष्ट्यांचा वापर एक हजारांहून अधिक सामन्यांमध्ये झाला आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@