भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : फादर स्टॅन स्वामींच्या घरावर छापा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019
Total Views |



पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी झारखंडमध्ये फादर स्टॅन स्वामींच्या घरावर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. बुधवारी पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुण्यात एल्गार परिषदेवर बंदी घालण्यात आल्यानंतर माओवाद्यांशी संपर्क असल्याच्या संशयावरून पाच जणांना अटक केली. त्यावेळी सुद्धा पोलिसांनी स्टॅन यांच्या घरावर छापा टाकला होता. परंतु, तेव्हा स्टॅन स्वामींना अटक करण्यात आली नव्हती.

 

२०१८ साली भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारापूर्वी एल्गार परिषदेने कथितरित्या बैठक घेत चिथावणी दिली होती, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत अनेकजणांना अटक करण्यात आली असून अटक आरोपींच्या चौकशीदरम्यान फादर स्टॅन यांचे नाव उघड झाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. पुणे पोलिसांनी या कारवाईसाठी झारखंड पोलीसांचीही मदत घेतलेली आहे.

 

मूळचे केरळचे असलेले फादर स्टॅन स्वामी गेल्या ५० वर्षांपासून झारखंडच्या चायबसा येथे आदिवासी संघटनांसाठी काम करतात आहेत. बिहार राज्याच्या विभाजनानंतर झारखंड राज्याची निर्मिती झाली. तेव्हा ते रांची येथे आले होते. 'नामकुंम बगेईचा' या संस्थेसाठी देखील काम केले. नक्षलवाद्यांचा ठपका ठेवून तुरुंगात डांबण्यात आलेल्या आदिवासींची ते मदत करतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@