डॉ. वीरेंद्र कुमार खटिक लोकसभेचे हंगामी अध्यक्ष!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी डॉ. वीरेंद्र कुमार खटिक यांची निवड करण्यात आली. डॉ. खटिक हे मध्यप्रदेशमधील टीकमगढचे भाजप खासदार असून ते सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. हंगामी अध्यक्षपदासाठी यापूर्वी संतोष गंगवार व मेनका गांधी यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र पक्षाकडून डॉ. खटिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 

डॉ. खटिक हे सात वेळेस लोकसभेवर निवडून आले आहेत. यामध्ये चार वेळेस सागर लोकसभा व तीन वेळेस टीकमगढ लोकसभा क्षेत्रातून ते निवडून आले आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी अल्पसंख्यांक तसेच महिला आणि बालविकास मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पहिला आहे. दरम्यान, डॉ. खटिक हे सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@