शिखर धवन वर्ल्डकप बाहेर : गंभीर दुखापतीमुळे निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांत आपल्या खेळीने भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून देणारा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळताना कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर शिखरच्या बोटाला दुखापत झाली. परिणामी, पुढच्या तीन आठवड्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली. शिखरच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती.

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नाथन कुल्टरचा एक उसळता चेंडू त्याच्या हातावर आदळला. त्यामुळे त्याच्या अंगठ्याला मार लागला होता. दुखापत झाल्यानंतरही तो सामना खेळत होता. त्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्या जागी रविंद्र जडेजा क्षेत्ररक्षण करत होता. पुढील सामन्यात शिखरच्या जागेवर श्रेयस आय्यर किंवा रिषभ पंत यांना संधी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

विश्वचषकात शिखर धवनची सरासरी आकडेवारी उत्तम आहे. आयसीसी टुर्नामेंटमध्ये शिखरच्या नावे सहा शतकांचा विक्रम आहे. २०१५ मधील विश्वचषकात त्याने दोन शतके ठोकली आहेत. दक्षिण अफ्रिका विरुद्ध सामन्यात शिखर धवनने ११७ धावा करुन भारताला दणदणीत विजय मिळवून दिला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@