पंतप्रधान मोदींसाठी पाकने केली हवाई हद्द मोकळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2019
Total Views |


नवी दिल्ली : शांघाय येथे होणाऱ्या समिटमध्ये सामिल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमार्गे किर्गिस्तानला जाऊ शकणार आहेत. पाकिस्तान सरकारने सोमवारी भारताचे अपील मंजूर केले आहे. पंतप्रधानांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्यास मंजुरी दिली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ आणि १४ जून रोजी 'एससीओ समिट'मध्ये सहभागी होणार आहेत. या संमेलनात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित राहणार आहेत. भारताने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या सर्वच भारतीय विमानांवर बंदी लावली आहे.

 

भारतातून परदेशात जाणारे ११ मार्ग पाकिस्तानातून जातात. या बंदीमुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. मात्र, पंतप्रधान मोदींच्या विमानासाठी पाकिस्तानने हवाई हद्द मोकळी करावी, असे अपील करण्यात आले होते. त्याला पाकिस्तानने हिरवा कंदिल दाखवला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@