'मिशन मून'साठी 'चंद्रयान २' सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थातर्फे (इस्त्रो) 'चंद्रयान २' मोहिमेवर पाठवण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. 'चंद्रयान २' पाठवण्यासाठी करण्यात आलेली अंतिम चाचणीही यशस्वी झाली आहे. तमिळनाडू येथील महेंद्रगिरी येथे हे परिक्षण करण्यात आले होते.


 

मिळालेल्या माहितीनुसार, या यानाला बंगळुरू येथील अंतराळ केंद्रातून १९ जून रोजी हलवण्यात येईल, त्यानंतर २० ते २१ जून रोजी श्रीहरीकोट्टा येथील प्रक्षेपण केंद्रावर आणले जाणार आहे. कडेकोट बंदोबस्तात असणाऱ्या चंद्रयानाचे ९ जुलै रोजी प्रक्षेपण केले जाणार आहे.



 

या यानात १३ भारतीय पेलॉड, आठ ऑर्बिटर, ३ लॅण्ड़र, २ रोव्हर असणार आहे. नासातर्फे एक पॅसिव्ह एक्सपिरीमेंटही केले जाणार आहे. दरम्यान, पेलोडच्या कामांबद्दल विस्तृत माहीती अद्याप देण्यात आलेली नाही. संपूर्ण यानाचे वजन हे ३.८ टन इतके असणार आहे.

 

इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. सीवान यांनी दिलेल्या माहीतीनुसार, चंद्रावरील काही खास खनिजांच्या शोधासाठी चंद्रयान २ चा वापर केला जाऊ शकतो. चंद्राचा पृथ्वीसमोर येत नसलेला दक्षिणी ध्रुवाच्या भागावर हा शोध घेण्यात येणार आहे. या मिशन दरम्यान ऑर्बिटर आणि लॅण्डर एकत्र जोडलेले असणार आहेत. याचप्रमाणे रोव्हर लॅण्डरच्या आत ठेवले जाईल.




यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर रॉकेट चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर रोव्हर आणि लॅण्डर वेगळे होतील. यानंतर चंद्रयान २ हे चंद्रावर दक्षिणी ध्रुवावर पूर्वनियोजित ठिकाणी उतरेल. त्यानंतर रोव्हर वैज्ञानिक चाचणीसाठी चंद्राच्या कक्षेत निघून जाईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@