युवराजची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2019
Total Views |


 


मुंबई : भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन युवराजने आपण आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. निवृत्तीची घोषणा करताना युवराज भावूक झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे 'सिक्सर किंग' अशी ख्याती असलेला युवराज आता यापुढे आंतराष्ट्रीय स्थरावर खेळताना आपल्याला दिसणार नाही.

 

२००० साली युवराजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०१७ सालापर्यंत तो आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहिला. यादरम्यान त्याने जीवघेण्या कॅन्सरवही मात करत त्याने तब्बल १७ वर्ष भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले. यात तो ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळला आहे. २०१७ नंतर युवराजने एकही आंतराष्ट्रीय सामना खेळला नसल्याने, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

 

२००७च्या टी-२० क्रिकेटमध्ये त्यांनी इंग्लंडविरोधात स्टुअर्ट ब्रॉड याला सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. तर २०११च्या विश्वचषक स्पर्धेत रक्ताच्या उलट्या होऊन देखील त्याने माघार घेतली नाही. भारताने तब्बल २८ वर्षानंतर जिंकलेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने मोलाची कामगिरी बजावत मालिकाविराचा किताब पटकावला होता. दरम्यान, निवृत्तीची घोषणा करताना युवराजने आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@