दोष फक्त इव्हीएम, व्हीव्हीपॅटचा नाही निवडणूक अधिकाऱ्यांचाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2019
Total Views |



मुंबई : इव्हीएममध्ये गडबड आहे, अशी शंका घेणाऱ्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा नवीन आरोप केला आहे. त्यांनी आता म्हटले आहे की दोष फक्त इव्हीएम, व्हीव्हीपॅटचा नाही, तर निवडणूक अधिकाऱ्यांचाही आहे. ज्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतमोजणीसाठी ही मशीन्स येतात ते अधिकारीही दोषी असू शकतात, असे आता शरद पवार यांनी म्हटले आहे. आम्ही या प्रकरणी तंत्रज्ञांशी आणि इव्हीएमतज्ज्ञांशी सखोल चर्चा करणार आहोत, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

 

तसेच या सगळ्यांशी चर्चा झाल्यावर आम्ही विरोधी पक्षातल्या नेत्यांशीही चर्चा करू, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. “आपण ज्या उमेदवाराला मत देतो आहे, त्याला ते जात नाही हे मतदारांना कळले, तर ते सध्या शांत राहतील. पण ते भविष्यात कायदा हातात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांनी कायदा हातात घेऊ नये म्हणून प्रयत्न केले जाणे आवश्यक आहेत, तेच आम्ही करतो आहोत,” असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

 

याआधी १ मे रोजीही शरद पवार यांनी इव्हीएमवर शंका घेतली होती. तसेच निवडणूक प्रचारादरम्यानही “मी अशी काही इव्हीएम मशीन्स पाहिली आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादीचे बटण दाबल्यास भाजपला मत गेले, हे मी डोळ्याने पाहिले आहे,” असेही वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी त्यांची खिल्लीही उडवली. आता फक्त इव्हीएमच नाही, तर निवडणूक अधिकारीही दोषी असू शकतात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

 

१ मे रोजी काय म्हटले होते शरद पवार?

 

“इव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे मी ऐकून आहे. या सर्व गोष्टी चिंताजनक आहेत. यंदा भाजप नेते सांगतात तसा अनपेक्षित निकाल लागला तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडेल आणि एकदा विश्वास उडाला की ते कोणत्याही टोकाला जातील,” असे त्यांनी म्हटले होते. “आता निकालात भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. ३०३ जागा मिळवत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा इव्हीएमबाबत शंका उपस्थित करतानाच निवडणूक अधिकाऱ्यांचाही दोष असू शकतो,” असे म्हटले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@