कठुआ अत्याचार प्रकरण : ३ नराधमांना जन्मठेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि तिच्या खूनप्रकरणी पठाणकोट न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सहापैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचसोबत प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

 

मुख्य आरोपी सरपंच सांझी राम, परवेश कुमार आणि दीपक खजुरिया या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्य ३ पोलिसांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली पाच वर्षांची कोठडी ठोठावण्यात आली. ८ आरोपींपैकी विशाल या एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उरलेल्या ७ जणांपैकी एक अल्पवयीन आहे.

 

काय आहे प्रकरण ?

 

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील ८ वर्षांची मुलगी मागलीवर्षी १० जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह जंगलामध्ये सापडला होता. आरोप आहे की, अपहरणानंतर मुलीला एक मंदिरात डांबून ठेवण्यात आले आणि कित्येक दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी मागील वर्षी एप्रिलमध्ये ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

 

आरोपपत्रानुसार, सांझी राम या अत्याचार आणि हत्याकांडाचा मास्टारमाईंड होता. चिमुकलीच्या अपहरणानंतर तिला सांझी रामच्या देखरेखीखालील मंदिरात डांबून ठेवण्यात आले होते. आरोपींनी येथेच मुलीवर अमानुष अत्याचार केले होते. न्यायालयाने या प्रकरणी पोलीस अधिकारी दीपक खजुरिया, सुरेंद्र वर्मा आणि अरविंद दत्ता, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि प्रवेसकुमार उर्फ मन्नू यांना दोषी ठरविले आहे. तर सांझी रामचा मुलगा विशाल याची मुक्तता केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@