९ जुलै ते १६ जुलै दरम्यान चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी विभाग सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2019
Total Views |



 

९ जुलै ते १६ जुलै दरम्यानच्या काळात होणाऱ्या चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी अवकाशयानातील सर्व विभाग सज्ज होत आहेत. चांद्रयान-२ ही भारताची दुसरी चांद्रमोहिम आहे. ऑर्बिटर, लेंडर (विक्रम) आणि रोव्हर (प्राज्ञान) असे या यानाचे तीन भाग आहेत. ऑर्बिटर आणि लँडर एकत्रित भाग असतील आणि हे भाग जीएसएलव्ही-एमके-३ प्रक्षेपक यानात ठेवण्यात येतील.

 

रोव्हर लँडरच्या आत असेल. पृथ्वीच्या भ्रमण कक्षेतून ऑर्बिटर आणि लेंडर हे एकत्रित भाग चंद्राच्या भ्रमणकक्षेत जातील. त्यानंतर लेंडर ऑर्बिटरपासून वेगळा होईल आणि चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर आधीच निश्चित केलेल्या भागात उतरेल यानंतर रोव्हरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर विविध वैज्ञानिक प्रयोग केले जातील. चांद्रयान-२ ची चंद्रावर उतरण्याची अपेक्षित तारीख ६ सप्टेंबर आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@