आम्ही राष्ट्रहिताला प्राधान्य देऊ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : अमेरिकेने भारताला दिलेला व्यापार अग्रक्रम दर्जा म्हणजेच जीएसपी दर्जा काढला असून त्याची अंमलबजावणी येत्या ५ जूनपासून करण्यात येणार आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत भारताने, आम्ही राष्ट्रहिताला प्राधान्य देऊ असे म्हटले आहे. वाणिज्य मंत्रालयाने यासंबंधी एक पत्रक काढले असून त्यात म्हटले की, भारताने अमेरिकेपुढे प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रस्तावर मांडला होता. परंतु, तो प्रस्ताव अमेरिकेला मान्य झाले नाही, हे दुर्दैवीच. अमेरिका अथवा अन् कोणत्याही देशाप्रमाणे भारत अशा प्रकरणात राष्ट्रहितास प्राधान्य देईल.

 

पुढे भारताने असेही म्हटले की, आम्हाला महत्त्वपूर्ण विकासाची आवश्यकता व काळजी असून भारतीय लोकदेखील उत्तम जीवनशैलीची अपेक्षा बाळगतात. जे सरकारसाठी विचारणीय असेल. तसेच आर्थिक संबंधामध्ये अशाप्रकारच्या गोष्टी घडत असतात. सामंजस्याने या गोष्टी सोडवता येतात आणि ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. आम्ही यापुढेही अमेरिकेबरोबरचे संबंध कायम बळकट करत राहू, असेही या पत्रकात स्पष्ट केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या अगोदर दि. ४ मार्च रोजीच असे सांगितले होते की, आम्ही भारताचा जीएसपी दर्जा काढणार आहोत. यानंतर देण्यात आलेला ६० दिवसांचा नोटीस कालावधी ३ मे रोजी संपला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@