किवींकडून श्रीलंकेचा दारुण पराभव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2019
Total Views |



कार्डिफ : आयसीसी विश्वचषक २०१९ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये श्रीलंकेची दैना झाली. न्यूझीलंडने श्रीलंकेला अवघ्या १३६ धावांमध्ये रोखले. त्यानंतर किवींनी १० विकेट्स राखून श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या करुणारत्ने वगळता एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही.

 

न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या दिमुथ करुणारत्नेने नाबाद ५२ धावांचे योगदान दिले. मात्र, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसनच्या माऱ्यासमोर इतर कोणाही फलंदाजाला करुणारत्नेला साथ देता आली नाही. हेन्री आणि फर्ग्युसनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर बोल्ट, ग्रँडहोम, निशम आणि सॅंटनर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

 

श्रीलंकेने दिलेल्या १३७ धावांचे माफक आव्हान गाठण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता हा सामना खिश्यात घातला. अवघ्या १७व्या षटकामध्ये हा विजय मिळवला. आयपीएलमध्ये चमकल्या मलिंगाची जादूदेखील अपयशी ठरली. १३७ धावांचा सामना करताना मार्टिन गप्टीलने ५१ चेंडूंमध्ये ७३ धाव केल्या तर कॉलिन मुनरोने ४७ चेंडूंमध्ये ५८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने हा पहिला सामना सहज आपल्या खिशात घातला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@