या वेडिंग सीझनमध्ये हेच गाणे लागणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |



सध्या लग्नाच्या सीझनमध्ये आणखी एका गाण्याची भर पडली आहे. येत्या ५ जूनला प्रदर्शित होणाऱ्या भारत या चित्रपटातील 'एथे आ' हे नवीन गाणे आज प्रदर्शित झाले आहे. सलमान खान आणि कतरीना कैफ यांना एकत्र करताना बघण्याची त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांची इच्छा अखेर या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे.

 

'एथे आ' हे गाणे आकसा सिंह, नीती मोहन आणि कमाल खान यांनी गेले असून विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे शब्द इर्शाद कामिल यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंट यांनी केले आहे. गाण्याचे ध्वनिमुद्रिकरण समर्थ चावला यांनी आयलंड सिटी स्टुडिओज मध्ये केले असून मायकेल पिल्लई यांनी सहकार्य केले आहे तर संगीत व्यवस्थापन आणि निर्मिती मेघदीप बोस यांनी केली आहे.

 

भारत या चित्रपटात सलमान आणि कतरीना बरोबरच नोरा फतेही, सोनाली कुलकर्णी, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ, तब्बू, असिफ शेख हे कलाकार देखील सहाय्यक भूमिकेमध्ये झळकणार आहेत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@