मुंबईच्या द किंग ग्रुपची जगभर चर्चा??

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |




अमेरिकेमध्ये सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड ऑफ डान्स या रिऍलिटी शो मध्ये मुंबईच्या 'द किंग ग्रुप' विजेता ठरला आहे. आपल्या डान्सच्या माध्यमातून सगळ्या मान्यवरांवर मोहिनी घालणारा हा संघ अखेर विजयी झाला. कित्येक महिन्यांपासून द किंग या ग्रुपने आपल्या उत्कृष्ठ कामगिरीने सगळ्या जगाला थक्क करून सोडले होते. मात्र आज त्यांना कष्टाचे चीज झाले असे म्हणायला हरकत नाही. या विजयाबरोबरच या विजेत्या टीमला १ दशलक्ष डॉलर बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

 

द वर्ल्ड ऑफ डान्स हा रिऍलिटी शो फक्त अमेरिकेत नाही तर देशभर प्रसिद्ध आहे. यामधील मान्यवर परीक्षक जेनिफर लोपेझ, डेरेक आणि ने-यो हे तिघेही अतिशय सुंदर आणि लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनाने द किंग टीमला याआधी देखील बराच आत्मविश्वास मिळाला होता. त्याचेच हे अंतिम फळ आहे. १७-२७ वयोगटातील या डान्सर्सनी प्रतिस्पर्धी टीमना मागे टाकून विजयाची मोहोर लावली आहे.



 

द किंग टीमची खरी सुरुवात झाली ती इंडियाज गॉट टॅलेंटच्या तिसऱ्या सीझनमध्ये विजयी झाल्यावर. त्या आधी त्यांनी खूप संघर्ष केला, कष्ट केले आणि आज त्यांना त्यांच्या आत्तापर्यंतच्या कष्टाचे फळ मिळाल्यासारखे नक्कीच वाटत असेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@