विश्वचषकात केदार जाधवच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |



मुंबई : आयपीएलनंतर सर्व भारताचे लक्ष आयसीसी विश्वचषकाकडे लागले आहे. भारताने त्यासाठी संघदेखील जाहीर केला आहे. परंतु, आयपीएलमधील दुखावतीचे सावट विश्वचषकावर पडण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याला आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. यावर बीसीसीआय त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे असे सांगितले आहे. केदार जाधव २३ मेपर्यंत ठीक न झाल्यास त्याच्या जागेवर दुसऱ्या राखीव खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

इंगलंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकासाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात बदल करण्याची अंतिम तारीख २३ मे ही असणार आहे. केदारला मोहाली येथे मागील सामन्यात पंजाब संघाविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानात परतला नाही. त्यामुळे तो आयपीएलमधील उर्वरित सामने खेळू शकला नाही. चेन्नईचा प्रशिक्षक फ्लेमिंगने सांगितले की, "केदार जाधव सध्या भारतीय संघाचे फिजियोथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्टसोबत फिटनेसवर भर देत आहे."

 

भारतीय संघाचे फिजियोथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाधव २२ मेपर्यंत ठीक होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ विश्वकरंडकासाठी २२ मे रोजी रवाना होणार आहे. विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. जर जाधव वेळेत फिट न झाल्यास ऋषभ पंत, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, नवदीप सैनी, इशांत शर्मा यापैकी एकाला संधी मिळू शकते.

 

केदारच्या समावेश न झाल्यास 'या' खेळाडूंचा होऊ शकतो समावेश

 

फरहार्ट यांच्या माहितीनुसार जर केदार जाधव फिट न झाल्यास रिषभ पंत , अंबाती रायुडू, नवदीप सैनी, अक्षर पटेल आणि इशांत शर्मा यापैकी एकाला विश्वकरंडक खेळण्यास संफही दिली जाऊ शकते. सध्या विश्वचषकासाठी भारतीय संघ मोठा दावेदार मानला जात आहे. त्यामुळे काय होणार हा प्रश्न सर्वांचा पडला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@