नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्यावर नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन उपस्थित झालेल्या वादातून त्यांच्या नागरिकत्वाची चौकशी करावी, अशी मागणी करणापरी याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे तुर्त नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे.

 

'बॅकॉप्स लिमिटेड' या ब्रिटिश कंपनीच्या २००३ सालच्या नोंदीत राहुल गांधी हे संचालक असल्याचे म्हटले होते. त्यात त्यांचे नागरिकत्व ब्रिटिश असल्याचे दिसून येते, असा आरोप राहुल गांधींवर आहे. राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतील एका अपक्ष उमेदवाराने उपस्थित केला होता. तेव्हापासून राहुल गांधी यांच्या अडचणीत भर पडली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.

 

प्रकरण नेमके काय ?

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल केली. स्वामी यांच्या पत्रानुसार, १० ऑक्टोबर २००५ व ३१ ऑक्टोबर २००६ रोजी ब्रिटिश कंपनीने दाखल केलेल्या आर्थिक विवरणपत्रात राहुल गांधी यांची जन्मदिनांक १९ जून १९७० दिली आहे. राहुल गांधींनी त्या कंपनीत नागरिकत्व ब्रिटीश असल्याचे म्हटले आहे. त्या प्रकरणी गृहमंत्रालयाने राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@