रविंद्रनाथ टागोर जयंती विशेष : जाणून घ्या पहिल्या भारतीय नोबेल पारितोषिक विजेत्याच्या या गोष्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |


साहीत्य देशपातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या आणि भारतातील पहीले नोबेल पारितोषिक विजेते असणाऱ्या रविंद्रनाथ टागोर यांची आज १५८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथील जोरासंको येथे झाला. बंगाली दिनदर्शिकेनुसार त्यांचा जन्मदिवस ९ मे रोजी साजरा केला जातो. रविंद्रनाथ टागोर केवळ कवी नसून एक चित्रकार, लेखक आणि संगीतकारही होते.

 

दोन देशांना दिले राष्ट्रगीत

रविंद्रनाथ टागोर हे दोन देशांसाठी राष्ट्रगीत लिहीणारे एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्या रचना दोन देश आपले राष्ट्रगीत म्हणून गातात. भारतासाठी जन-गण-मन... आणि बांग्लादेशचे आमार शोनार बांग्ला... अशा या महान गीतकार आणि कवीने हजारो गीतांची रचना केली आहे.

 

प्रेरणादायी व्यक्तीमत्व

रविंद्रनाथ टागोर यांच्या प्रेरणादायी विचार अनेकांना मार्गदर्शक ठरत आहेत. 'केवळ पाण्यावर उभे राहील्याने समुद्र पार करता येत नाही. त्यासाठी पाऊल पुढे टाकणेही तितकेच महत्वाचे आहे.' त्यांच्या मते, 'आत्मविश्वासाला त्यांनी जीवनात महत्वाचे स्थान आहे. विश्वास असा पक्षी आहे जो पहाटेपूर्वीच्या अंधारातही प्रकाशाचा अनुभव करू शकतो आणि नवप्रेरणेचे गान गाऊ शकतो'

 


पुस्तकाचा सातशे डॉलर्सना लिलाव

टागोर यांचे एक लोकप्रिय पुस्तक 'द किंग ऑफ डार्क चेंबर', या पुस्तकाचा अमेरिकेत सातशे डॉलर्सना (४५ हजार रुपये) लिलाव करण्यात आला. सन १९१६ मध्ये हे पुस्तक अमेरिकेतील मॅकेनिकल कंपनीने प्रकाशित केले होते. टागोर यांच्या रहस्यमय 'राजा' या हिंदी नाटकाचा इंग्रजी अनुवाद आहे.

 

विश्व भारती विद्यालयाची स्थापना

पश्चिम बंगाल येथील शांती निकेतन येथे कला आणि साहीत्याची विविध रुपे पाहायला मिळतात. टागोर यांचे या साऱ्याशी घट्ट नाते होते. १८६३ मध्ये त्यांचे वडिल ब्रम्हो समाज आश्रम आणि विद्यालयाची स्थापना त्यांनी केली होती. त्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी येथेच विश्व भारती विद्यालयाची स्थापना केली.

 

३५०० कवितांचा डिजिटल संग्रह

रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या एकूण ३ हजार ५०० कवितांचा एक डिजिटल कवितासंग्रह तयार करण्यात आला आहे. त्यापैकी १५ कविता त्यांच्याच आवाजातील आहेत. अन्य २४५ कविता अन्य वक्त्यांच्या आवाजत आहेत. पुर्णेदु सरकारने हा संग्रह तयार केला आहे. यामध्ये 'रबिंद्र कबिता अर्काइव' ११० रविंद्र संगित आणि १०३ इंग्रजी कवितांचाही सामावेश आहे. सर्वात जास्त प्रसिद्ध कविता म्हणून ६० कवितांचा वेगळा संग्रह यातच आहे.

 

वयाच्या साठाव्या वर्षी चित्रकलेची सुरुवात

रविंद्रनाथ टागोर यांनी वयाच्या साठाव्या वर्षापासून चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. अमेरिका आणि रुस येथे त्यांची चित्रे संग्रह करण्यात आलेली आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात ब्रिटन, जपान, अमेरिका, चीन आदी देशांमध्ये सफर केली. तिथल्या अनुभवांवर आधारित कादंबऱ्याही लिहील्या आहेत.

 

वैयक्तिक जीवन

टागोर यांनी आपले शालेय शिक्षण सेंट झेव्हीयर स्कुल येथून पूर्ण केले. त्यानंतर लंड़नमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते गेले होते. मात्र, पदवी न घेताच ते परत आले. त्यांचे बंधू संत्येंद्रनाथ टागोर यांनी १८६४मध्ये सीव्हील सर्विस उत्तीर्ण झाले होते. ते देशातील पहिले आयसीएस बनले होते. १८८४३ मध्ये रविंद्रनाथ टागोर यांचा विवाह मृणालीनी देवी यांच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीने उच्च शिक्षण घेतले. इंग्लंडमध्ये जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. त्यांनी काही पुस्तकांचा अनुवादही केला. टागोर यांना पाच अपत्ये होती.




 

 



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@