आदिनाथ कोठारे यांच्या "पाणी" ला न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |


महेश कोठारे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठे नाव. त्यांचा सुपुत्र आदिनाथ कोठारे यांना आत्तापर्यंत आपण मुख्यत्वे अभिनय करताना पहिले आहे. आता पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून "पाणी" या मराठी चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले आहे. त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला १९ व्या न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि आदिनाथ कोठारे यांना सर्वोत्कृष्ट अभनेता म्हणून सन्मान मिळाला असून एका अर्थाने त्यांच्या चांगल्या कामाची पावती त्यांना मिळाली आहे.
'पाणी' या चित्रपटाबरोबरच अरिजित सिंह दिग्दर्शित सा, सर, शिवरंजनी ऍण्ड टु अदर वूमन या चित्रपटांना देखील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.


 
 

नुकत्याच पार पडलेल्या यावर्षीच्या १९ व्या न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात ३२ चित्रपटांचा समावेश होता त्यापैकी २९ कथा, ३ डॉक्युमेंटरी आणि ३२ लघुपट होते. यावर्षी या महोत्सवात प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांची संख्या २० होती यामध्ये बंगाली, मराठी, असामी, तामिळ, मल्याळम, कन्नड, लडाखी, पंजाबी आणि हरियाणवी या भाषांचा समावेश होता.

या महोत्सवाचे अनावरण 'सर' या रोहेना गेरा दिग्दर्शित चित्रपटाने झाले तर त्यानंतर फोटोग्राफ, द लास्ट कलर हे चित्रपट देखील या महोत्सवादरम्यान दाखवण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@