Video : 'विपक्षकी निकली हवा इसबार फिर एकबार मोदी सरकार...!'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : आयपीएलचे शेवटचे दोन स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहेत. लोकसभा निवडणूकीच्याही दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. याचा संदर्भ देत भाजपने विरोधकांवर एका व्हिडिओद्वारे निशाणा साधला आहे. भाजपच्या ट्विटरवर ट्विट करण्यात आलेल्या एका २५ सेकंदाच्या व्हिडिओतून मोदींनी विरोधकांना मैदानात उतरण्यापूर्वीच हरवले आहे, असा टोला लगावण्यात आला आहे.

 

विपक्ष की निकली हवा इस बार.. फिर एक बार मोदी सरकार.., अशी टॅगलाईन या व्हिडिओत देण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये मोदींच्या गोलंदाजीला समोरे जाण्यास विरोधक घाबरत असल्याचे दाखवण्यात आले आहे. भाजपाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओतील व्यंगचित्रांच्या मदतीने राजकीय सामना दाखवण्यात आला आहे.




 

 
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोलंदाजी समोर कोणताही विरोधी पक्षाचा फलंदाज समोर येत नसल्याचे चित्र दाखवण्यात आले आहे. विरोधी पक्षातील प्रत्येक बडा नेता दुसऱ्या नेत्याला मोदींचा समाना करण्यासाठी पुढे ढकलत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये मोदी चेंडू उडवत फलंदाज येण्याची वाट पाहत असताना दिसतात. तर समोर विरोधी पक्षातील नेते मोदींना पाहून घाबरून दुसऱ्या नेत्याला पुढे करताना दाखवले आहेत.

 

विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्य अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, बहुजन समाजवादी पक्षाच्या मायावती आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आदींची व्यंगचित्रे दाखवण्यात आली आहेत. व्हिडिओच्या शेवटी विपक्ष की निकली हवा इस बार.. फिर एक बार मोदी सरकार..ही ओळ दाखवत विरोधकांवर टिका करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@