भारतातील पहीले अॅपल स्टोर मुंबईत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी असलेल्या अॅपलने आता आपले लक्ष भारताकडे केंद्रीत केले आहे. स्मार्टफोनच्या दुनियेत आपले अढळ स्थान कायम राखण्यासाठी आता मुंबईत भारतात अॅपलचे पहीले दालन खुले होणार आहे. मुंबईतील जागांसाठी अॅपलने आता एक यादी तयार केली आहे.

ब्लूमबर्ग या वृत्तवाहीनीच्या हवाल्यानुसार, मुंबईतील या जागांची तुलना न्यूयॉर्कच्या आयकॉनिक फिफ्थ अॅव्हेन्यू, लंडनच्या रीजेंट स्ट्रीट स्टोर आणि पॅरिस येथील चॅंप्स एलिसीसशी तुलना केली जाणार आहे. भारतात फोनची निर्मिती होत नसल्याने अॅपलचे दालन उघडण्यासाठी परवानगी यापूर्वी मिळत नव्हती. अॅपलने नुकतिच दोन मैन्युफैक्चरिंग यूनिटची स्थापना केली होती, त्यामुळे आता परवानगी मिळण्याची अडचण दूर झाली आहे.

भारताची बाजारपेठ आव्हानात्मक : टीम कुक

अॅपलच्या इतर फोन्सच्या तुलनेने महाग असलेल्या उत्पादनांमुळे भारतीय बाजारपेठेत कंपनीला मोठा संघर्ष करावा लागत आहे. शाओमी, व्हीवो यांसारख्या स्वस्त स्मार्टफोन्समुळे बाजारपेठ आव्हानात्मक असल्याचे मत टीम कुक यांनी व्यक्त केले. भारतात होत असलेल्या उत्पादनामुळे स्मार्टफोन्सवर पूर्वी लागू होणाऱ्या २० टक्क्यांच्या आयातशुल्कातून सवलत मिळालेली आहे.


'
भारत आमच्यासाठी महत्वपूर्ण देश'

"भारत आमच्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे मत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कुक यानी व्यक्त केले आहे. आम्ही या बाजारपेठेतून बऱ्याच गोष्टी शिकत आहोत. एका सर्वेक्षणानुसार २०१९ या वर्षाच्या पहील्या तिमाहीत अॅपलची शिपमेंट ७५ टक्क्यांहून अधिक घसरली आहे."


iPhone XR
वर डिस्काऊंट

अॅपलने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या आयफोन एक्स आरवर सवलत देण्याचे जाहीर केले आहे. हा स्मार्टफोन ५९ हजार ९०० रुपयांना विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची मुळ किंमत ७६ हजार ९०० रुपये आहे. या फोनवर २२ टक्के म्हणजे एकूण १७ हजारांची सवलत जाहीर केली आहे. ठराविक बॅंकेच्या क्रेडीट आणि डेबिट कार्टवर १० हजारांची कॅशबॅकही जाहीर केली आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@