बालनाट्य रसिकांसाठी ‘टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |


 

मुंबई : यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिकच रंगतदार बनविण्याकरिता बालमित्रांसाठी थिएटर कोलाज निर्मित आणि अपूर्वा प्रोडक्शन प्रस्तुत टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टीहे बालनाट्य सादर करत आहेत. येत्या ११ मे, रोजी सकाळी दहा वाजता, राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे शुभारंभ प्रयोग आयोजित केला आहे. बाल-नाट्य रसिकांसाठी ही मे महिन्यातली पर्वणी आहे. 

दर्जेदार अभिनयाने कलाक्षेत्रामध्ये आपली वेगळी छाप उमटवणाऱ्या पल्लवी वाघ-केळकर यांनी या बालनाट्याची मूळ कथा, संकल्पना आणि दिग्दर्शन केले आहे. नेपथ्य मार्गदर्शन सचिन गावकर, संगित अनुराग गोडबोले, प्रकाश योजना योगेश केळकर, रंगभूषा उल्हेश खंदारे या सर्वाच्या मेहनतीने हे नाटक प्रेक्षकांच्या समोर सादर होत आहे. पल्लवी वाघ सह २६ लहान मुलांचा हा समूह बाल नाट्यप्रेमींचा आणि बालकांचा उन्हाळा अविस्मरणीय करण्यासाठी सज्ज आहे. या बालनाट्यामध्ये सिद्धीरुपा करमरकर आणि अक्षय शिंपी या अनुभवी कलाकारांचा विशेष सहभाग आहे. एका उत्तम आशयाचे हे बालनाट्य रंगभूमीवर सादर करण्यासाठी अपूर्वा प्रोडक्शनचे संस्थापक सुमुख वर्तक यांनी बहुमूल्य योगदान दिले आहे.  

 

“टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी” या बालनाट्यातील ‘टिपूजी’ हे पात्र तुमच्या समोर दोन कथा गुंफुन तुम्हाला बालनाट्याद्वारे सांगणार आहे. ह्या बालनाट्याचे कथानक दोन कथांवर आधारित आहे. त्यातील पहिली कथा एका ढिंच्याक दृष्टीहीन मुलीची आहे. तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि तिच्या या गुणांमुळे तिने इतर मुलांना दिलेली नवी दृष्टी यावर आधारित आहे. दुसरी कथा एका वसतिगृहात राहणारी मुले त्यांच्या पासून लांब असणारे त्यांचे पालक आणि त्यांची शिक्षिका याच्या आयुष्यावर आधारित आहे. उत्तम संगीताची सांगड घालून हे नाटक तुम्हाला आणि तुमच्या मुलांना खिळवून ठेवेल, त्याबरोबरच आयुष्यातील मूल्यांवर प्रकाश देखील टाकेल. नावाप्रमाणेच वेगळ्या असणाऱ्या या गोष्टी लहानमुलांचे आयुष्य समृद्ध करतील यामध्ये काही शंकाच नाही. बालनाट्याविषयी अधिक माहितीसाठी ७०३९८६५२७२ या क्रमांकावर संपर्क करावा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@