'कबीर सिंह' मधील शाहिद कपूरचा डॅशिंग लूक लोकप्रिय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |



 

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'कबीर सिंह' हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये शाहिद कपूर मध्यवर्ती भूमिकेत दाखवण्यात आले असून त्याच्या मागील बाजूला किआरा अडवाणी आणि चित्रपटातील काही अस्पष्ट सीन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात शाहिद कपूर एका डॉक्टरांची भूमिका साकारणार आहे. या अशी त्याने अशाप्रकारची भूमिका साकारलेली नसल्यामुळे त्याच्याकरिता ही एक आव्हानात्मक भूमिका असेल.



'कबीर सिंह' हा चित्रपट कबीर सिंह या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असून त्याच चित्रपटाचे दिग्दर्शक या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट येत्या २१ जून ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून १३ मे ला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे आज सांगण्यात येत आहे. या आधी चित्रपटाचा एक टिझर प्रदर्शित झाला असून तो पाहिल्यावर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही उत्सुकता किती लोकांना चित्रपटगृहापर्यंत घेऊन येते हे लवकरच कळेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@