"माय फिल्म माय डिसिजन"-एकता कपूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |

 

मालिका आणि चित्रपट निर्मितीसाठी लोकप्रिय असलेली एकता कपूर आणि 'मेंटल है क्या' या चित्रपटातील मुख्य कलाकार कंगना राणावत आणि राजकुमार राव हे सध्या चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढे ढकलण्यात आलेली तारीख. कालपासून माध्यमांमध्ये याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत असताना चित्रपटाची निर्माती एकता कपूर यांनी आज सगळ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "माय फिल्म माय डिसिजन" अशा शब्दात तिने चित्रपट पुढे का ढकलला याचे स्पष्टीकरण प्रेक्षकांसाठी दिले आहे. 
 

 

'मेंटल है क्या' हा चित्रपट २१ जुलै ला प्रदर्शित होणार होता मात्र आता त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून तो आता २६ जुलै ला प्रदर्शित होणार आहे. कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यात झालेला वाद आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. आणि हृतिक रोशन चा आगामी चित्रपट 'सुपर ३०' हा देखील त्याच दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र यावर एकता कपूर यांनी खुलासा केला आहे की हा पूर्णपणे व्यावहारिक दृष्ट्या घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे कोणीही याविषयी तर्क वितर्क लावू नयेत अशी विनंती चित्रपटकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@