रणवीर सिंह आगामी चित्रपटाच्या तयारीमध्ये जुंपला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |



८३ च्या वर्ल्ड कपमधील भारताचा विजय ही प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक अभिमानाची आणि गौरवाची घटना आहे. याच ऐतिहासिक घटनेवर आधारित
'८३' हा चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील सर्वात उत्साही समजला जाणारा रणवीर सिंह तत्कालीन कप्तान कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. आणि त्यासाठीच पुढील १० दिवस तो कपिल देव यांच्या सहवासात दिल्लीमध्ये राहणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

रणवीर सिंह हा त्याच्या मेहेनती आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे. पद्मावत मध्ये अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारण्यासाठी त्याने घेतलेली मेहेनत ही सर्वश्रुत आहे. आता '८३' या चित्रपटासाठी पुढील १० दिवस कपिल देव यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, त्यांचे राहणीमान, विशेष लकबी या सगळ्याचा जवळून अनुभव घेण्यासाठी तो त्यांच्याबरोबर दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेणार आहे.

रिलायन्स एन्टरटेन्मेटन्ट आणि कबीर खान यांच्या संयुक्त प्रयत्नांनी कबीर खान यांचेच दिग्दर्शन असलेला '८३' हा चित्रपट पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होईल अशी शक्यता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@