राहुल गांधींनी मागितली न्यायालयाची बिनशर्त माफी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : राफेल करार संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना सर्वोच्च न्यायालयाने 'चौकीदार चोर है', असा उल्लेख केल्याबद्दल राहुल गांधींनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे. राहुल गांधींनी उल्लेख केल्यानुसार, "चौकीदार चोर हे" हे वक्तव्य न्यायालयाने केला नसल्याचे स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र त्यांनी बुधवारी सादर केले.

 

राहुल यांनी न्यायालयात बुधवारी तीन पानी प्रतिज्ञापत्र दाखल करून केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. 'माझ्याकडून अनावधानाने न्यायालयाचा हवाला देत 'चौकीदार चोर है...', असे शब्द निघाले. तसा माझा कोणताही हेतू नव्हता,' असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिले. यापूर्वीही राहुल यांनी न्यायालयात दोन प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. मात्र, त्यात माफी मागितली नव्हती, तर दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या वकीलांकडून आज पुन्हा माफीनामा सादर करण्यात आला आहे.

 

राहुल गांधी अडचणीत का आले ?

राफेल करार प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही 'चौकीदार चोर' असल्याचे मान्य केले आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. राहुल यांनी असे वक्तव्य करून न्यायालयाचा अपमान केल्याचे सांगत भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर राहुल यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat


@@AUTHORINFO_V1@@