राहुल गांधींसारखा दिसत असल्याने तरुण वैतागला, केले असे काही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |



सुरत : 'तु राहुल गांधींसारखा दिसतोस', या वाक्याला कंटाळून सुरत येथील एका तरुणाने स्वतःचे २० किलो वजन कमी केले. वाढलेल्या वजन आणि बदललेल्या केशरचनेमुळे आता तो पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागला असून यामुळे तो समाधानी आहे. राहुल गांधींसारखा दिसत असल्याच्या प्रतिक्रिया आणि उपहासाला कंटाळून त्याने हा खटाटोप केला आहे.

 

सुरत येथील एका रेस्ट्रोरंटचे मालक प्रशांत सेठी यांचा चेहेरा राहुल गांधी यांच्याशी मेळ खात होता. त्याचे परिचित आणि त्यांची पत्नीही त्यांना राहुल म्हणूनच थट्टेत हाक मारायची. त्यांच्या रेस्ट्रोरंटमध्ये बरेचसे ग्राहक त्यांची झलक पाहण्यासाठी येत असत. प्रशांत ग्राहकांच्या चर्चेचा विषय ठरत होते.

 

प्रशांत हे गेल्या पाच वर्षांपासून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांनी वजन कमी करत आपली केशरचनाही बदलून घेतली. काही दिवसांपूर्वी त्यांना एका चित्रपटात राहुल गांधींची भूमिका करण्यासाठी ऑफरही आली होती. राहुल गांधीसारखे दिसत असल्याच्या प्रतिक्रीयांना कंटाळून सेठी यांनी लुक बदलण्याचा निर्णय घेतला होता. रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांनी राहुल गांधींसारखे न दिसण्याची काळजी घेऊ लागले.

 

सेठी यांच्या पत्नी गुंजन म्हणतात कि, "त्यांनी त्यांचा लुक बदलल्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही. यापूर्वी त्यांना ते नील नितीन मुकेश यांच्यासारखे दिसत असल्याच्याही प्रतिक्रीया आल्या होत्या." सेठी यांच्या वडिलांनी प्रशांत यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@