ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |



मुंबई : मराठीतील ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांनी मंगळवारी वयाच्या ६९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या वास्तवदर्शी विचारांनी अनेक नाटकांची निर्मिती केली होती. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाळी १० वाजता मुलुंडच्या टाटा कॉलनी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई आणि नात असा परिवार आहे.

 

वामन तावडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नाटके लिही आहेत. त्यांच्या प्रत्येक नाटकामध्ये वैविध्यपूर्ण विषय मांडले. त्यांनी सातत्याने वेगळा विषय घेऊन त्यातून सामाजिक प्रश्न मांडले. वास्तवदर्शी नाटक आणि एकांकिका ही त्यांची खासियत होती. छिन्न हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेमध्ये गाजले त्यानंतर ते व्यावसायिक स्वरूपात रंगभूमीवर आले. कन्स्ट्रक्शन, पिदी, मी घोडा हुसेनच्या चित्रातला, रायाची रापी आदी एकांकिका आणि छिन्न, इमला, रज्जू, चौकोन, तुम्ही आम्ही, कॅम्पस ही नाटके त्यांच्या लेखणीतून उतरली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@