मनोहर जोशींचा राणेंवर पलटवार : ज्यांनी मोठं केलं त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |



मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी आत्मचरित्रातून केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर आता शिवसेनेकडून पहील्यांदाच प्रतिक्रीया देण्यात आली आहे. आत्मचरीत्रात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर नारायण राणेंनी गंभीर आरोप केले होते. मात्र, जोशी यांनी ते फेटाळून लावले आहेत. राणेंनी आत्मचरित्रातून केलेल्या आरोपांचे जोशींनी खंडन केले आहे. एका पक्षात २५ वर्षें काम केले, त्याच पक्षाविरोधात बोलणे योग्य नाही, ज्यांनी मोठे केले, त्यांच्यावरच टीका करणे योग्य नसल्याचा सल्लाही जोशींनी राणेना दिला आहे.

 

मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुखांचा

"मला मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होता. बाळासाहेब ठाकरे एक आश्चर्यच होते. कुठल्याही सभेला बाळासाहेब मला घेऊन जायचे, त्यामुळेच माझे शत्रू निर्माण झाले. काही शत्रू असतात, काही अतिरेकी असतात, असेही जोशी म्हणाले.

 

राणेंच्या शिक्षणावरून टोला

नारायण राणेंने त्यांच्या शिक्षणावरूनही यावेळी टोला लगावण्यात आला. जोशी म्हणाले, "शिक्षणात माणसाचे आचार-विचार महत्त्वाचे असतात. राणेंच्या तोंडून हे मी प्रथमच ऐकतोय. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही."

शिवसेनेची आजची स्थिती जोशींमुळेच

नारायण राणे यांनी आत्मचरित्रात उल्लेख केल्यानुसार, 'शिवसेनेच्या आजच्या स्थितीला मनोहर जोशीच जबाबदार आहेत. ' आत्मचरित्रात राणेंनी उल्लेख केल्यानुसार, माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्याने जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जरी जोशी शिवसेनेचे चिंतक असल्याचे वाटत असले तरी त्यांच्या निर्णयामुळे पक्षाची आज अशी परिस्थिती झाली आहे. जोशी उद्धवजींच्या जवळचे होऊ लागले होते. पद्धतशीरपणे त्यांनी विरोधी नेत्यासाठी सुभाष देसाईंचं नाव पुढे केलं. नारायण राणेंनी जोशींवर असा आरोप केला होता, त्याचं जोशींकडून खंडन करण्यात आलं आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@