समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना मारहाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |



पुणे : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे त्यांच्या साथीदारांना गो रक्षकांकडून मारहाण करण्यात आली. गो रक्षक म्हणून गो शाळा चालविण्यावरुन झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळालाय आहे. सासवड येथे मंगळवारी सीताराम बाबा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे कार्यकर्त्यांसह आले होते. यावेळी एकबोटे यांनी मारुती मंदिरातील कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. यादरम्यान पंडित मोडक यांनी कार्यकर्त्यांसह तेथे येऊन एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

 

सहाय्यक फौजदार जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित मोडक यांची झेंडेवाडी येथे गोशाळा आहे. मात्र, गोशाळा चालविण्याची मोडक यांची पद्धत चुकीची असल्याचा एकबोटे यांचा समज आहे. यावरून मिलिंद एकबोटे आणि मोडक यांच्या मागील काही वर्षांपासून मतभेद आहेत. याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांनी रात्री उशिरा सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सासवड पोलीस करीत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@