या बॉलिवूड स्टार्सनी दिले थॅलेसेमिया टेस्टला प्रोत्साहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |

 

द विशिंग फॅक्टरी या संस्थेने थॅलेसेमिया दिनाच्या निमित्ताने थॅलेसेमिया या गंभीर रोगापासून वाचण्यासाठी योग्य त्या चाचण्या करा असे आवाहन सर्वांना केले आहे. याच अभियानाला प्रोत्साहन देण्याकरीता 'आधीवाली जिंदगी मिटाओ' हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. आपले बॉलिवूडचे कलाकार देखील या अभियानाच्या प्रसार आणि प्रचारासाठी पुढे सरसावले आहेत.

कुणाल कपूर, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी यांच्यासह क्रिकेटपटू सुरेश रैना याची पत्नी प्रियांका रैना या सर्व प्रसिद्धीप्राप्त लोकांनी देखील या चांगल्या अभियानाला प्रोत्साहन दिले असून याचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.


 

हिंदी असो किंवा मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपून वागताना आपण पाहतो. हे त्याचेच एक उदाहरण आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे आपण सर्व या अभियानाला हातभार लावू शकता आणि थॅलेसेमियाचा समूळ नाश करण्यास मदत करू शकता.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@