विद्या बालन साकारणार शकुंतला देवी यांची भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |



गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावर आधारित जीवनपटामध्ये विद्या बालन त्यांची भूमिका साकारणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. शकुंतला देवी गणिती क्रियांमध्ये इतक्या पारंगत होत्या की यांना 'मानवी संगणक' अशी उपमा देण्यात आली आहे.

 

 


शकुंतला देवी अवघ्या ५ वर्षाच्या असतानाच त्यांनी गणितावर प्रभुत्व प्राप्त केले. त्यामुळे आशा या महान गणितज्ञाची भूमिका करायला मिळणे ही विद्या बालनसाठी पर्वणीच आहे. शकुंतला देवी यांच्या या जीवनपटाचे जीवनपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनु मेनन करणार असून विक्रम मल्होत्रा चित्रपटाची निर्मिती करणारा आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.


शकुंतला देवी या अतिशय नावाजलेल्या गणितज्ञ तर होत्याच पण त्या उत्तम लेखिका देखील होत्या. त्यांनी लिहिलेले समलैंगिक संबंधांवर आधारित पुस्तक हे या विषयावरील भारतातील पहिले लिखाण आहे. १९८२ साली शांकुंतला देवी यांचे नाव त्यांच्या गणितीय प्रतिभेमुळे गिनीज बुक मध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. अशा या महान गणितज्ञावरील जीवनपट केव्हा प्रदर्शित होईल याची उत्सुकता आता सर्वांनाच असणार आहे.

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@