तुम्हाला कोणाचा लूक आवडला ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2019
Total Views |



न्यूयॉर्क मधील मेट्रोपॉलिटिअन आर्ट स्टेडियम येथे आयोजित 'मेट गाला' चा कार्यक्रम काल पार पडला. बॉलिवूड आणि आता हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पडणाऱ्या दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांनी आपल्या मेट गालाच्या लूकने सर्वांना आकर्षित करून घेतले. दोघींनीही यावर्षी तिसऱ्यांदा मेट गालामध्ये आपला सहभाग नोंदवला.

दीपिका पदुकोण हिने जैक पोजन या ब्रॅण्डचा एक मेटॅलिक पिंक गाऊन परिधान केला होता. दीपिकाचा हा लूक एका परीसारखा दिसत होता. त्यामुळे दीपिकाच्या या लूकवर सगळ्यांची नजर खिळून होती. त्याचबरोबर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी देखील आपल्या दिऑर या ब्रॅण्डच्या लूकने सर्वांची मने जिंकली.

गेल्या काही वर्षांपासून मेट गाला या कार्यक्रमामध्ये चर्चित असलेल्या लेडी गागा, केटी पेरी, यांनी देखील वेगवेगळे लूक या दरम्यान सादर केले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@