इंडियाज मोस्ट वोन्टेडमधील 'अकेला' हे गाणे प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2019
Total Views |


राजकुमार गुप्ता यांचे दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या 'इंडियाज मोस्ट वोन्टेड' या चित्रपटातील 'अकेला' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. इंडियाज मोस्ट वोन्टेड हा चित्रपट येत्या २४ मे ला देशभर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराचा मागोवा घेणाऱ्या भारतातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या कथेवर बेतलेला आहे.


 


हे गाणे अभिजित श्रीवास्तव यांनी गायले असून अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केले आहे तर या गाण्याचे शब्द अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.
'अकेला' हे गाणे चित्रपटाची कथा पुढे नेण्यास मदत करते. या गाण्यामध्ये देखील काही घडामोडी घडत असल्यामुळे हे गाणे इतर चित्रपटांसारखे वगळता येणार नाही.

 

काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमधील अर्जुन कपूर आणि त्याच्या साथीदारांच्या गुप्त अभियानाची छोटीशी झलक आपण पाहिल्यानंतर हे मिशन नेमके कसे पार पडेल याविषयी आपली उत्कंठा वाढली असणार. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाचे लेखन देखील राजकुमार गुप्त यांनी केले आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची मांडणी कशी झाली आहे आणि भारतातील सर्वात मोठे गुप्त अभियान काय होते हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@