एनसीपीएमध्ये रंगणार पु.ल. देशपांडे यांच्या आठवणींचा उत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2019
Total Views |



मुंबई :
प्रसिध्द लेखक, निर्देशक, नाटककार, स्क्रीनप्ले लेखक, अभिनेता, संगीतकार आणि हार्मोनिअम वादक असे चतुरस्त्र कलाकार म्हणजे पु.ल. देशपांडे. त्यांनी आपल्या कार्यकाळात एनसीपीएचे सन्मानयीय संचालक म्हणून देखील जबाबदारी पहिली.

त्यांचे लेखन, मग ते जरी संगीत किंवा संगीत वादकांविषयी नसले तरी त्यांच्यामध्ये संगीत किती भिनले होते हे दर्शवते. अनेक समर्पक संदर्भ आणि त्यांचे संगीताविषयी दिलेले शेरे नवीन श्रोतेवर्गाची जणूकाही जडणघडण करुन गेले.

पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिध्द शास्त्रीय गायक सत्यशील देशपांडे पु. ल देशपांडे यांच्या सांगीतिक कारकिर्दीशी संबंधित आणि संगीतकांरांवरील लिखाणातील मनोरंजक उतारे सादर करणार आहेत. या सत्रामध्ये लाइव्ह सादरीकरणे आणि पुलंनी ज्यांच्याबद्दल लिखाण केले आहे अशा अख्तरीबाई फैजाबादी, केसरबाई, बरकत अली, कुमार गंधर्व, बालगंधर्व, मल्लिकार्जून मन्सूर आणि इतर अनेकांची दुर्मिळ रेकॉर्डिंग्ज सादर केली जाणार आहेत.

 

 

हा कार्यक्रम मुंबईतील नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अर्थात एनसीपीए येथे आयोजित करण्यात आला आहे. येत्या १० तारखेला म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी कार्यक्रमाला सुरूवात होईल. ९० -१५० रु. इतके शुल्क या कार्यक्रमासाठी आकारण्यात येणार आहे. तरी पु.ल. देशपांडे यांच्या लेखनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर परिक्षांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@