अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |



मुंबई : अक्षय तृत्तीयेनिमित्त सराफा बाजाराला झळाळी चढली असून यंदाही सोनेखरेदीची परंपरा कायम आहे. यंदा पारंपारिक सोने खरेदीसह ग्राहकांनी ऑनलाइन बाजारापेठेतही सोने खरेदीसाठी उत्साह दाखवला आहे. वैशाख महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या या सणाचा मुहूर्त हिंदू आणि जैन धर्मियांसाठी महत्वाचा मानला जातो. या दिवशी बरेचजण शुभ कार्याची सुरुवात करतात. त्यामुळे सोनेखरेदीही केली जाते. या दिवशी खरेदी केलेल्या सोन्यामुळे घरामध्ये समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.


दरवर्षी प्रमाणे सराफा बाजारात नागरिकांनी सोनेखरेदीसाठी उत्साह दाखवला आहे. सराफा व्यापारांनी दिलेल्या माहीतीनुसार, अनेक ग्राहकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनेखरेदीसाठी आगाऊ मागणी केली आहे. आता ऑनलाईन बाजारपेठेतही सोनेखरेदीचा उत्साह दिसून येत आहे. अवघ्या काही महिन्यांत १ लाखांहून अधिक लोकांनी
'ऑगमाँट' या अॅव्दारे लाखों रुपयांचे सोने खरेदी केल्याचे विक्रेते सांगत आहेत. यात दाक्षिणात्य राज्य अग्रेसर असून दिवसाला ६ किलो सोन्याची विक्री होत आहे. सोन्याचे दर वाढले तरीही मागणी यंदाही कायम राहणार, असा विश्वास सराफा बाजाराला आहे.


पारंपारिक बाजाराप्रमाणेच पोहेहार
, मोहनमाळ, गोफ, बांगड्या, पाटल्या, शाहीहार, गोठ आदी दागिन्यांची फँशन पुन्हा एकदा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. सणासुद्दीला तसेच अश्वाश्वत स्थितीत ग्राहकांचा आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदी खरेदीकडे कल असतो. इक्विटी बाजार चढा राहिल्याने ग्राहक सोने खरेदीकडे भर देत असून यंदा ग्राहकांसाठी सोन्याच्या खरेदीवर चांदी मोफत ठेवल्याचे ऑगमाँटचे संचालक सचिन कोठारी यांनी सांगितले.


आॅनलाइन बाजारात सर्वसामान्य ग्राहकांकडून १ ते ५ ग्रँम पर्यंतच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे कोठारी यांनी नमुद केले. जागतिकरणानंतर जगण्याला आलेला वेग पाहता ग्राहकांना घरबसल्या अगदी मोबाइलद्वारे ०.१ ग्रँमपासून ते १ किलोपर्यंत ऑगमाँट अॅपव्दारे सोने-चांदी करता येत आहे. वेळेची बचत
, पारदर्शकता आणि सुरक्षित पर्याय असल्याने खरेदी करत असल्याचे नेहा सोहनी यांनी सांगितले.

सोन्यावर चांगला परतावा मिळण्याची शक्यता

यंदा अक्षयतृतीयेला चांगला परतावा मिळण्याची शक्यता गुंतवणूकतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. येत्या काळात बाजारातील सोन्याच्या मागणीवरून हा अंदाजव्यक्त करण्यात आला आहे. शेअरखानचे उपाध्यक्ष प्रवीण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोन्याला आजवर चांगला परतावा मिळत नसला तरीही येत्या काळात ही उत्तम गुंतवणूक ठरू शकते."

पेपर गोल्ड बॉण्ड, ईटीएफमध्ये गुंतवणूक

अक्षय तृतीयेनिमित्त सोनेखरेदी करण्यासाठी गोल्ड बॉण्ड किंवा गोल्ड ईटीएफ गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. गोल्ड बॉण्डसारख्या दीर्घ कालीन गुंतवणूकीच्या पर्यायांबद्दलही तुम्ही गुंतवणूक सल्लागारांना विचारून केल्यास त्याचाही फायदा होईल, असे मत गुंतवणूक सल्लागारांनी व्यक्त केले आहे.

सोमवार दि. ६ मे रोजी सोन्याचा दर : ३२ हजार ६७० रुपये

सोन्याचे मुहूर्ताचे दर

२०१८ - ३१ हजार २००

२०१७ - २९ हजार ४००

२०१६ - ३० हजार

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@