भारत-पाक सामना : अवघ्या २ दिवसात विकली गेली तिकिटे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |



नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाक संबंध अधिकच बिघडले आहेत. बीसीसीआयने पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने आयसीसीकडे पाकिस्तानला विश्वचषकात खेळू देऊ नका, अशी मागणी केली होती. नंतर आता अखेर बीसीसीआयने आपला निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार असे दिसत आहे. आयसीसीने वेळापत्रक जाहीर केले असून तिकीट बुकिंग चालू केले. विशेष म्हणजे अवघ्या २ दिवसातच सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. मॅन्चेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफॉर्ड स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

 

३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ १६ जून २०१९ रोजी समोरासमोर खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाद क्रिकेटच्या माध्यमातून व्यक्त होते. त्यामुळे दोन्ही देशातील घरोघरी आणि चौका-चौकांतील दुकानावरील टीव्हीवर हा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा होते. हा सामना प्रत्यक्षात पाहण्यासाठी चाहत्यांनी दोन दिवसांत सर्व तिकीटे विकत घेतले आहेत. हे तिकीटे विकत घेण्यात भारतीयांची संख्या जास्त आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@