श्रीलंकेतून दोनशे मुस्लीम धर्मगुरुंची हकालपट्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |



कोलंबो : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात स्थानिक जिहादी गटाचा हात असल्याची माहीती उघड झाल्यानंतर आता श्रीलंकेत व्हिसाची मदत उलटून गेलेल्या परदेशी नागरिकांवरील कारवाई कडक केली आहे. श्रीलंकेतील सहाशे परदेशी नागरिकांना मायदेशात पाठवण्यात आले आहे. त्यात दोनशे मुस्लीम धर्मगुरुंचाही सामावेश आहे.

 

श्रीलंकेचे गृहमंत्री वजिरा अबेवर्देना यांनी दिलेल्या माहीतीनुसार, या सर्वांनी कायदेशीर मार्गाने प्रवेश केला असला तरीही बॉम्बस्फोटानंतर आलेल्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे आणि व्हिसा उलटूनही वास्तव्य केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे दंड आकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

व्हिसा नियमावली होणार कडक

श्रीलंकेतील व्हिसा संदर्भातील नियम आता आणखी कडक करण्यात येणार असून त्याबद्दल विचार सुरू केला जाणार आहे. आता धर्मगुरुंसाठी व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल केले जाण्याची शक्यता आहे. ईस्टर डे दिवशी श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये एकूण २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर, पाचशेहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@