मला जबरदस्तीने कॉंग्रेसला मत द्यायला लावले; महिलेचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |


अमेठी : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशात राहुल गांधी निवडणूक लढवत असलेल्या मतदार संघात एका मतदान केंद्रावर बळजबरीने मतदान करायला लावल्याची तक्रार एका वृद्ध महिला मतदाराने केली आहे. "मला कमळापुढील बटण दाबायचे होते मात्र, मतदार केंद्रावरील अधिकाऱ्याने मला हाताच्या पंजावर बटण दाबण्यास बळजबरी केली", असा आरोप या महिलेने केला आहे.

उत्तर प्रदेशातील गौरीगंज गुजरटोला मतदान केंद्र क्रमांक ३१६ येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. "हाथ पकडकर जबरदस्ती पंजा पर धर दिहिन, हम देहे जात रहिन कमल पर", म्हणजेच मला कमळाला (भाजप) मत द्यायचे होते मात्र, त्या अधिकाऱ्याने माझा हात पकडून पंजावर (कॉंग्रेस) बटण बळजबरीने दाबायला लावले., असा आरोप लावल्यानंतर या प्रकारावर आता टीका करण्यात येत आहे.





याबद्दल अद्याप कोणतिही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, घटनेचा तपास सुरू केला असल्याची माहीती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. अमेठीत काँग्रसच्या राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी निवडणूक लढवत आहेत. देशपातळीवर ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. अमेठी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून राहुल गांधी येथून तीन वेळा खासदार बनले आहेत. मात्र, स्मृती इराणी गेल्या काही वर्षांपासून अमेठीत सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे या कॉंग्रेसच्या गडाला सुरूंग लावणार का, कि राहुल गांधी आपला बालेकिल्ला राखणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष्य आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@